Last Updated: Saturday, August 25, 2012, 21:59
www.24taas.com, बीजिंगचीनच्या हैनान प्रांतात वॉटर फेस्टिव्हलदरम्यान काही तरुणांनी विकृतीची सीमा गाठली. वॉटर फेस्टिवल चालू असताना काही तरुणांनी सर्वासमक्ष तरुण मुलींचे कपडे फाडले आणि लैंगिक अत्याचारही केला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.
चीनच्या बाओटिंग ली, क्विशियान व मियाओ भागात वॉटर फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला होता. या फेस्टिव्हलमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक सहभागी झाले होते. त्यात तरुणांची संख्या अधिक होती. सर्वत्र सणांचा आनंद लुटला जात होता. जल्लोष होत होता. हे चालू असतानाच काही तरुणांनी तेथील तरुण मुली व महिलांना अचानक घेरले आणि त्यांचे कपडे फाडले. इतकंच नव्हे तर काही मुलींवर लैंगिक अत्याचारही केले.
घडल्या प्रकारामुळे सर्वांनाच धक्का बसला. तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी प्रसंगावधान दाखवून महिलांना वाचविलं. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी या विकृत तरुणांना ताब्यात घेतलं. परंतु, या हल्ल्यामुळे संबंधित महिलांना जबर मानसिक धक्का बसला आहे. या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे.
First Published: Saturday, August 25, 2012, 20:27