Last Updated: Monday, April 21, 2014, 16:54
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई पहिल्याच दिवशी १२ करोडची मोठी ओपनिंग करत, `२ स्टेट्स` या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धूम उडवून दिली आहे. या सिनेमात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता अर्जुन कपूर काम करत आहेत.
हा सिनेमा चेतन भगतच्या `२ स्टेट्स` या गाजलेल्या कहाणीवर आधारीत आहे. सिनेमाची कथा ही दोन वेगवेगळ्या राज्यातील प्रेमी युवकांची कथा आहे.
सुत्रांच्या आधारे नवोदित दिग्दर्शक अभिषेक वर्मनच्या पहिल्याच सिनेमाने पहिल्याच दिवशी १२.४२ करोड रुपयांची कमाई केली आहे. मुक्ता आर्ट्सच्या संजय घई यांनी सांगितलं की, "हा सिनेमा सर्व ठिकाणी हाऊसफूल आहे. कुठलाही खान नसताना देखील या सिनेमाने पहिल्याच दिवशी १२ ते १३ करोडचा व्यवसाय केला आहे."
करण जोहर आणि साजिद नाडियाडवाला यांनी एकत्र या सिनेमाची निर्मिती केली आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, April 21, 2014, 16:54