Last Updated: Monday, October 1, 2012, 15:15
www.24taas.com, मुंबई बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन आजारी पडलेत. त्यांना सर्दी-खोकल्यानं हैराण करून सोडलंय. ही माहिती दुसरं तिसरं कुणी दिली नसून स्वत: ‘बिग बी’नंच दिलीय. तेही सोशल वेबसाईट ट्विटरवरून...
आपल्या चाहत्यांशी डायरेक्ट संवाद साधण्याचा बीग बींना एक चांगला मार्ग मिळालाय. तो म्हणजे सोशल नेटवर्किंग... आजारी असतानाही हाच पर्याय त्यांना त्यांच्या चाहत्यांच्या जवळ घेऊन आला. अमिताभनं या साईटवरून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत आपलं सुख-दुख इथं शेअर करतात... अमिताभनं ट्विटरवर लिहलंय, ‘कालची रात्र खूप त्रासदायक ठरली... जोराच्या खोकल्यामुळे पोटातही दुखत होतं... नुकतीच पोटावर शस्त्रक्रिया झालीय आणि ती अजून पूर्णत बरी व्हायचीय.’
पण, चाहत्यांना दिलासा देत आपण उपचार घेत असल्याचंही बिग बीनं यावेळी म्हटलंय. आपण काही तज्ज्ञांशी संपर्क साधलाय. अन्टीबायटिक आणि सिरप घेतल्यानंतर आपण काही घरगुती औषधांचाही वापर करून पाहिल्याचं अमिताभ यांनी सांगितलंय. अमिताभ बच्चन यांना पोटदुखीच्या तक्रारींनंतर फेब्रुवारी महिन्यात शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर ते कायम डॉक्टरांच्या संपर्कात आहेत.
First Published: Monday, October 1, 2012, 11:23