अनुष्का आधी विराटच्या आयुष्यात होती मी – इझाबेल लेते I had affair with Virat : isabel leit

अनुष्का आधी विराटच्या आयुष्यात होती मी – इझाबेल

अनुष्का आधी विराटच्या आयुष्यात होती मी – इझाबेल
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

विराट कोहली सोबत आपले गेले दोन वर्ष संबंध होते, अशी कबुली बॉलिवू़ड अभिनेत्री आणि ब्राझीलीयन मॉडेल इझाबेल लेते हिनेच दिली आहे. लॅक्मेच्या जाहिरातीत झळकणारी इझाबेल गेले दोन वर्ष सध्याचा लोकप्रिय भारतीय खेळाडू विराट सोबत असल्याने एक नवीन चर्चा सध्या बॉलिवुडमध्ये रंगते आहे. कदाचित इझाबेलचा लवकरच येणारा `पुरानी जिन्स` सिनेमाला चर्चेत आणण्यासाठी हे गुपित तिने आता उघड केल्याचं काही फिल्म जाणकार बोलत आहेत.

मीडियाशी बोलताना इझाबेल म्हणाली, ‘मी विराट सोबत गेली दोन वर्ष रिलेशनमध्ये होती. तसेच अभिनेता सिद्धार्श मल्होत्रा सोबत माझं काहीही संबंध नाही. आम्ही फक्त मैत्रीच्या नात्यात वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतो’. पण यावेळी बोलताना इझाबेलने विराट कोहलीच्या सोबत असलेल्या आपल्या संबंधावर जोर टाकला.

सध्या विराट आणि अनुष्काचे संबंध लोकांमध्ये गाजत आहेत. या कारणाने इझाबेल लेते आणि विराट कोहलीच्या संबंधावर लोकांमध्ये कशी चर्चा रंगते हे पहावं लागेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 1, 2014, 14:55


comments powered by Disqus