Last Updated: Tuesday, May 20, 2014, 17:32
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली `क्वीन` सिनेमाच्या यशानंतर कंगणा राणावतने तब्बल ३ करोड रूपयांच्या ऑफरला कंगणाने एका झटक्यात नकार दिला आहे. एका लग्न सोहळ्यात तिला डान्स करण्यासाठी ३ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती.
कंगणाच्या बहिणीने सांगितलं की, `कंगणाला आपल्या सिनेमा क्षेत्रात जास्त लक्षं द्यायचं आहे. तिने आता पर्यंत अशा प्रकारे लग्नाला उपस्थिती लावून नाचण्याचं कामं केलं नाही. याच कारणाने कंगणा असे सोहळ्यात आपली उपस्थिती लावणार नाही.
जेव्हा पासून कंगणा सिनेमा क्षेत्रात उतरली आहे. तेव्हा तिेचे अनेक सिनेमे हिट गेले आहेत. याच कारणाने दिल्लीत एका लग्न सोहळ्यात नाचण्यासाठी कंगणाला ३ करोड रूपयांची ऑफर देण्यात आली. पण कंगणाने ती ऑफर स्वीकारली नाही.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, May 20, 2014, 17:32