`बँग बँग`च्या शुटींग दरम्यान कॅटरीना दुखापतग्रस्त katrina injured in bang bang movie

`बँग बँग`च्या शुटींग दरम्यान कॅटरीना दुखापतग्रस्त

`बँग बँग`च्या शुटींग दरम्यान कॅटरीना दुखापतग्रस्त
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

अभिनेत्री कॅटरीना कैफला `बँग बँग` सिनेमाच्या चित्रीकरणावेळी दुखापत झाल्याने, सिनेमाचं शुटींग पुन्हा एकदा थांबवण्यात आलं आहे. या आधी ही या सिनेमाचं शुटींग हृतिकच्या अपघातामुळे लांबणीवर पडलं होतं.

कॅटरीनाच्या स्नायुंमध्ये दुखापत झाल्याने, कॅटला शुटींग करण्यात त्रास होत आहे. तरी देखील कॅटरीनाने आपल्या दुखापतीस प्रध्यान्य न देता, सिनेमाचं शुटींग करण्याचा निर्णय घेतला आहे. हृतिक सोबत एका गाण्याचं शुटींग सुरू असताना, कॅटरीनाला ही दुखापत झाली.

`बँग बँग` सिनेमात कॅटरीना आणि हृतिकच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन सिद्धार्थ राज आनंद करत आहे. हा सिनेमा हॉलीवुड मुवी `नाइट अँड डे`चं रीमेक आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, April 27, 2014, 16:00


comments powered by Disqus