Last Updated: Monday, May 12, 2014, 18:12
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई आपल्या बोल्ड अंदाजाने नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असलेली मल्लिका शेरावत पुन्हा एकदा कानच्या रेड कार्पेटवर दिसणार आहे. मल्लिकाचं "कान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल" मध्ये जाण्याचं पहिलं निमित्त ठरलं होतं, ते २०१० मधील तिचा फ्लॉप चित्रपट `हिस्स`.
मात्र यावेळेस तिच्या एकही चित्रपटाचा समावेश नसूनही, ती पाचव्यांदा कान फेस्टिवलमध्ये सहभागी होणार आहे. इतकंच नव्हे, तर मल्लिका तेथील भारतीय उद्योग महासंघाच्या सीआयआय पॅव्हेलियनचे उद्घाटन करणार आहे.
कान फेस्टिवल १४ ते २५ मे दरम्यान होणार असून, अशोक अमृतराज आणि फ्रान्सचे भारतीय राजदूत अरुण कुमार हे सुद्धा उपस्थित असणार आहेत. तसेच मल्लिकाचा सुरुवातीच्या सत्रात सहभाग असेल आणि सत्राचा विषय `भारतीय सिनेमा : जागतिक सिनेमांसोबत समन्वय आणि संधी` असणार आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, May 12, 2014, 18:12