Last Updated: Wednesday, December 18, 2013, 21:22
www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरू ...तर भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणखी स्मार्ट दिसलीस, असे मत बॉलिवूडची अभिनेत्री चित्रांगदा सिंग हिने व्यक्त केलं आहे. त्यासाठी मोदींनी दाढी, मिशी काढायला हवी, असं चकीत करणार विधान चित्रांगदा हिने केलंय.
बंगळुरू शहरात जिलेट कंपनीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अनशेवन इस अनबेद्ड’ अभियानच्यावेळी चित्रांगदाने प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले, मोदींनी आपली दाढी आणि मिशी काढू शकतात. त्यांनी तसे केले तर ते अधिक चांगले दिसतील. मात्र, त्याचवेळी तिला विचारले गेले की पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी यांच्या सारखे दाढीवाले पुरुष आकर्षक दिसत नाहीत का? त्यावेळी तिने म्हटले, जर तुम्ही शीख आहात तर दाढी ठेवण्यामागे धार्मिक कारण आहे. तसेच धार्मिक कार्यासाठी दाढी वाढवणे चांगली गोष्ट आहे. शीख हे दाढीतच जास्त आकर्षक दिसतात
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, December 18, 2013, 21:22