सलमान बनणार न्हावी तर रणबीर वडा-पाववाला salman working as a barber

सलमान बनणार न्हावी तर रणबीर वडा-पाववाला

सलमान बनणार न्हावी तर रणबीर वडा-पाववाला
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलीवुड अभिनेता सलमान खान, करण जौहर, रणबीर कपूर आणि हरभजन यासोबतच अजून अनेक सेलिब्रिटी नव्याने सुरू होणाऱ्या ‘मिशन सपने’या कार्यक्रमात दिसणार आहेत. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्यं म्हणजे हे सगळे सेलिब्रिटी एका दिवसासाठी का होईना पण एखाद्या सामान्य माणसासारखा घालवणार आहेत.

या कार्यक्रमात सगळे सेलिब्रिटी एखाद्या सामान्य माणसासारखं काम करणार आहेत आणि पैसेदेखील कमवणार आहेत. हा कार्यक्रम वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना एकत्र आणू शकेल. तसंच कलाकारांना आपल्या प्रसिद्धीचा वापर एखाद्या सामान्य माणसाला मदत करण्यासाठीही करता येणार आहे.

या कार्यक्रमात दर्शक आपल्या आवडत कलाकारांना सामान्यांसारखे टॅक्सी चालवताना, भाजी विकताना तसंच सेल्समनच्या रुपात पाहू शकतील. यावेळी हे सेलिब्रिटीज लोकांच्या घरी जाऊन वस्तू विकतानाही दिसतील... लोकांची मदत करताना दिसतील... आपण केलेल्या कामांचा इतरांना उपयोग व्हावा, यासाठीच हे सेलिब्रिटी झगडतानाही दिसतील.


या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनमध्ये बॉलीवूड, टीव्ही, खेळ, संगीत इत्यादी क्षेत्रातील सेलिब्रिटी दिसतील. एका दिवसासाठी सलमान खान न्हावी बनणार आहे, दिग्दर्शक करण जोहोर फोटोग्राफर, रणबीर कपूर वडा-पाव विक्रेता, वरूण धवन पट्टीवाला, सिद्धार्थ मल्होत्रा भाजी विकणारा, हरभजन सिंह चटपटीत पदार्थ विकणारा तर मिका सिंह चहावाला बनणार आहे.

या टीव्ही शोचा २७ एप्रिलला रात्री ८ वाजता पहिला शो प्रसारित होईल. या कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दीर्घकाळ पडद्याआड गेलेली सोनाली बेंद्रे या कार्यक्रमाची होस्ट असेल.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, April 18, 2014, 15:54


comments powered by Disqus