शाहरूख आपल्या शब्दाचा पक्का नाही Shah Rukh Khan Clears Air on Anti-Modi Tweet, Gets Back ...

शाहरूख आपल्या शब्दाचा पक्का नाही

शाहरूख आपल्या शब्दाचा पक्का नाही
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

नरेंद्र मोदींच्या विरोधात देश सोडण्याची भाषा करणाऱ्यांमध्ये ट्विट करून शाहरूख खान देखील चांगलीच टिवटिव करत होता. `नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यास देश सोडून देऊ`, अशी भीष्म प्रतिज्ञा शाहरूखने सात महिन्यांपूर्वी केली होती. पण आता मात्र मी असं बोललोच नाही, असा दावा शाहरूखने केला आहे.

मोदी पंतप्रधान झाल्यावर अनेकांनी शाहरूखला `देश सोडून जा` असा संदेश इंटरनेटवरून दिला. याला उत्तर म्हणून शाहरूखने मी देश सोडण्याचं ट्विट केलंच नाही, असं सांगितलं. या कारणाने शाहरुखच्या ट्विटमुळे मात्र सोशल साइटवर किंग खानविरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे.

शाहरूख प्रमाणेच कमाल राशिद खान यानेही मोदी पीएम झाल्यास देश सोडून जाईन असे सांगितले होते. याच प्रमाणे कमाल खानने देश सोडला आहे. कमालने विमानात बसलेला आपला फोटो आणि `मी सांगितल्याप्रमाणे देश सोडून जात आहे`, असं ट्विट देखील केलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 20, 2014, 17:42


comments powered by Disqus