दारूची जाहिरातीमुळे शाहरुख, अजय देवगण अडचणीत shahrukh get notice from court, for play role in liquor

दारूची जाहिरातीमुळे शाहरुख, अजय देवगण अडचणीत

दारूची जाहिरातीमुळे शाहरुख, अजय देवगण अडचणीत
www.24taas.com, झी मीडिया, मध्य प्रदेश

बॉलीवूडमधील काही अभिनेत्यांना मध्यप्रदेशातील न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. सोडा विक्री जाहिरातीच्या नावाखाली दारू विक्री प्रमोट करण्याचा आरोप या सिनेतारकांवर ठेवण्यात आला आहे. नोटीस पाठवण्यात आलेल्या सिनेस्टार्समध्ये बॉलीवुड अभिनेता शाहरुख खान, अजय देवगन, सुनील शेट्टी, सैफ अली खान आणि मनोज वाजपेयी यांचा समावेश आहे.

मध्य प्रदेशातील एक्साईस कराच्या नियमाखाली, कलम २३ ए नुसार दारू विक्रीची जाहिरात करणं हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बंधनकारक आहे. हा नियम तोडणाऱ्या व्यक्तीला ६ महिने कैद होऊ शकते.

न्यायाधीश डी. के. पालीवाल यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील दाखल केलेल्या एका मिसलेनियस क्रिमिनल केसच्या सुनावणी दरम्यान दारू विक्री करणाऱ्या कंपनीचा प्रचार करणाऱ्या सेलिब्रिटींना ६ आठवड्यात स्पष्टीकरण द्यायला सांगितले आहे.

या कलाकारांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ता अशोक सिंह भदौरिया यांनी वकील अवधेश सिंह भदौरियाच्या माध्यामातून याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीत न्यायालयाने प्रिंसिपल सेक्रेटरी (होम), ग्वालियरचे एसपी, इंदरगंज पुलिस स्टेशनचे इंस्पेक्टर आणि तीन दारू विक्री करणाऱ्या सप्लायर्सना देखील नोटीस पाठवली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, May 11, 2014, 19:00


comments powered by Disqus