Last Updated: Wednesday, April 30, 2014, 19:24
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई `एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा` या शोमध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तर गेस्ट जज म्हणून काम करणार आहे. या शोच्या एका स्पेशल एपिसोडसाठी शोएब गेस्ट ज्युरी म्हणून राहणार आहे. फराह खान आणि अनु मलिक सोबत शोएब ज्युरीचं काम पाहणार आहे. या शोच्या शुटींगसाठी शोएब अख्तर मुंबईत आला होता.
शोएब संपूर्ण जगात रावलपिंडी एक्सप्रेस आणि आपल्या लांब केसांसाठी फेमस आहेत. शोएबने सांगीतलं की, "मला खूपच मजा आली. भारतात खूपच टॅलेंट आहे. त्यांच्या सोबत काम करण्यात मला खूपच मजा आली.
अनु मलिक आणि फराह खान यांच्या सोबत स्क्रीन शेयर करणं खूप मोठी गोष्ट आहे. इथल्या प्रतियोग्यांचा परफोर्मन्स खूपच चांगला होता. या शोचा मला गेस्ट जज बनून, मला खूपच मजा आली."
`एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा` या शोच नवीन सिझन 12 मे रोजी प्रसारीत होणार आहे. पण शोएबचा शो कधी दाखवला जाईल हे अजून सांगण्यात आलेले नाही.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, April 30, 2014, 19:24