श्रद्धा आणि सिद्धार्थचा पाण्याखाली रोमान्स shradhha kapoor and sidhharth doing romance in underwater

श्रद्धा आणि सिद्धार्थचा पाण्याखाली रोमान्स

श्रद्धा आणि सिद्धार्थचा पाण्याखाली रोमान्स
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

श्रद्धा कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा एकत्र सिनेमा करत आहेत. येणाऱ्या काहीच दिवसात `एक विलेन` या सिनेमात हे दोघे झळकणार आहेत. या सिनेमाच्या एका गाण्यासाठी श्रद्धा आणि सिद्धार्थने स्कूबा डायविंग केली. आहे. श्रद्धा ही एक चांगली डायवर आहे. तसेच सिद्धार्थ मल्होत्रापण एक चांगला डायवर होण्याचा प्रयत्न करत आहे.

सिद्धार्थ आणि श्रद्धाने `विलेन के गलियां` या गाण्यासाठी स्कुबा डायविंग केली आहे. या गाण्याच्या शुटींगसाठी चक्क सात तास हे दोघे पाण्याखाली होते. या शुटींगसाठी सिद्धार्थला मात्र खूपच मेहनत घ्यावी लागली. दिग्दर्शक मोहित सूरीला मात्र या शूटींगमध्ये परफेक्ट शॉट देणं हे काही सोपी गोष्ट नव्हती. पण श्रद्धा आणि सिद्धार्थच्या मेहनतीने अखेर शुटींग मस्त झालं.

या डायविंगसाठी ऑक्सीजन सीलेंडर हे स्कुबा डायवरला जोडलेले नव्हते, तर त्यांना फ्रेंच डायवरने ऑक्सीजन सप्लाय धरून पूर्ण मदत केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 8, 2014, 18:52


comments powered by Disqus