सल्लूनं पाकिस्तानला दिला ‘अल्ला का वास्ता’ - Marathi News 24taas.com

सल्लूनं पाकिस्तानला दिला ‘अल्ला का वास्ता’

www.24taas.com, मुंबई
 
पाकिस्तानमधील भारतीय कैदी सरबजीतच्या सुटकेसाठी आता अभिनेता सलमान खानही पुढे सरसावला आहे. सलमाननं ट्विटरच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केलीय.
 
पाकिस्तान सरकारनं सरबजीतची सुटका करावी, अशी अपेक्षा त्यानं ट्विट केलीय. गेल्या दोन दशकांपासून सरबजीत पाकिस्तानच्या तुरुंगात खितपत पडलाय. त्याच्या सुटकेसाठी पाकिस्तानी नागरिकांनी मला समर्थन द्यावं असं सांगत त्यानं पाकिस्तानी जनतेला ‘अल्ला का वास्ता’ या शब्दांत विनंती केलीय. ‘माझी पाकिस्तानी नागरिक, माध्यम प्रतिनिधी, पाकिस्तानी सरकार, राष्ट्राध्यक्ष झरदारी या सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी सरबजीतला त्यांच्या कुटुंबाकडे परत पाठवावे, त्यांच्या कुटुंबाच्या आनंदात सहभागी होण्याची संधी मला द्याल अशी मला आशा आहे,’ असंही सलमानंनं लिहिलंय.
 
.

First Published: Friday, June 29, 2012, 17:09


comments powered by Disqus