सरबजीतची मुलगी बनली नायब तहसीलदार!

Last Updated: Wednesday, May 29, 2013, 15:47

पंजाब सरकारनं सरबजीतची मुलगी स्वप्नदीप कौर हिला नायब तहसीलदार या पदावर रुजू करून घेतलंय.

पाकिस्तानी कैदी सनाउल्लाहचा मृत्यू...

Last Updated: Thursday, May 9, 2013, 10:41

पाकिस्तानी कैदी सनाउल्लाहचा अखेर चंदीगडच्या पीजीआय हॉस्पीटलमध्ये मृत्यू झालाय.

जम्मूमध्ये पाकिस्तानी कैद्यावर प्राणघातक हल्ला!

Last Updated: Friday, May 3, 2013, 16:47

जम्मूमध्ये कोट बलावल जेलमध्ये हाणामारी झालीये. यात सनाउल्लाह हा पाकिस्तानी कैदी गंभीर जखमी झालाय. त्याला ICUमध्ये दाखल करण्यात आलंय...

सरबजीत सिंग यांचं हृदय आणि किडनी पाकिस्तानातच?

Last Updated: Friday, May 3, 2013, 15:54

लाहोरमधून भारतात आल्यावर त्यांचं पुन्हा शवविच्छेदन करण्यात आलं. मात्र सरबजीतचं हृदय आणि किडनी पाकिस्तानातच काढून घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

शासकीय इतमामात सरबजीत यांच्यावर अंत्यसंस्कार

Last Updated: Friday, May 3, 2013, 15:49

पाकिस्तानातील तुरुंगात हल्ला झाल्यानंतर जिन्ना रुग्णालयात प्राण गमवावे लागलेल्या सरबजीत सिंग यांच्यावरील अंत्यविधीं थोड्या वेळापूर्वीच पार पडला.

सरबजीत कोण होता, त्याची कहाणी!

Last Updated: Thursday, May 2, 2013, 23:44

पाकिस्तानच्या तुरुंगात कैद्यांनी जीवघेणा हल्ला केल्यानंतर सरबजीतला उपचारासाठी जिन्ना रुग्णालायता भरती करण्यात आलं...गेले सहा दिवस एक आशा होती की सरबजीत या दुर्देवी संकटातून सहिसलामत वाचतील.. पण सा-या आशा, अपेक्षा प्रार्थना निष्फळ ठरल्या.

सरबजीत पार्थिवाचं आता पुन्हा पोस्टमॉर्टम

Last Updated: Thursday, May 2, 2013, 23:14

पाकिस्तानातील तुरुंगात हल्ला झाल्यानंतर जिन्ना रुग्णालयात प्राण गमवावे लागलेल्या सरबजीत यांचं पार्थिव अमृतसरला आणण्यात आलं आहे. लाहोरहून एअर इंडियाच्या विशेष विमानाने सरबजीत यांचं पार्थिव भारतात आणण्यात आलं. तर पुन्हा पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे.

सरबजीत सिंग मृत्यू, अनेक प्रश्नांना जन्म?

Last Updated: Thursday, May 2, 2013, 20:41

सरबजीत सिंग यांच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्नांना जन्म दिलाय. किती दिवस आपण अशा घटना सहन करत राहणार? पाकिस्तान आणि त्याला छुपा पाठिंबा देणा-या अमेरिकादी पाश्चिमात्य देशांना चोख उत्तर देण्याची वेळ आता आली आहे, असं केंद्र सरकारला वाटत नाही का?

द्या सरबजीत सिंग यांना श्रद्धांजली

Last Updated: Thursday, May 2, 2013, 10:33

सरबजीत सिंग याचं आज पहाटे पाकिस्तानमध्ये निधन झालं. लाहोरच्या जिन्ना हॉस्पिटमध्ये उपचारादरम्यान सरबजीत सिंग यांचा मृत्यू झाला.

सरबजीत सिंग यांचे निधन; मृत्यूशी झुंज अपयशी

Last Updated: Thursday, May 2, 2013, 07:59

सरबजीत सिंग याचं आज पहाटे पाकिस्तानमध्ये निधन झालं. लाहोरच्या जिन्ना हॉस्पिटमध्ये उपचारादरम्यान सरबजीत सिंग यांचा मृत्यू झाला.

सरबजीत सिंगचा मेंदू मृत, प्रकृती नाजूक

Last Updated: Tuesday, April 30, 2013, 14:59

पाकिस्तानी जेलमध्ये बंदी असणारा भारतीय कैदी सरबजीत सिंगला केलेल्या मारहाणी मुळे त्यांच्या मेंदूला जबर दुखापत झाली होती.

सरबजीतला परदेशात नेण्यास पाकची मनाई

Last Updated: Monday, April 29, 2013, 14:26

पाकिस्तानमध्ये कैद्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सरबजीत सिंगला उपचारासाठी परदेशात नेण्यात येणार नाही. त्याच्यावर पाकिस्तानमध्येच उपचार केले जाणार आहेत.

सरबजीतचे कुटुंब पाकीस्तानात, अधिकाऱ्यांना भेटण्यास केली मनाई

Last Updated: Sunday, April 28, 2013, 15:41

सरबजीतची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्याचे कुटुंबिय सध्या काळजीत आहे. आज सरबजीतचे कुटुंबीय पाकिस्तानात पोहचले. वडिलांना भारतात पाठवावं अशी मागणी सरबजीतची मुलगी पूनम हिनं केलीय.

`कसाबची फाशी आणि सरबजीतच्या सुटकेचा संबंध नाही`

Last Updated: Friday, November 23, 2012, 19:03

पाकिस्तान अजमल कसाबची फाशी आणि सरबजीत हे दोन मुद्दे वेगवेगळेच ठेवण्यात येतील, अशी ग्वाही पाकिस्तानचे सुरक्षा मंत्री रहेमान मलिक यांनी दिलीय.

सल्लूनं पाकिस्तानला दिला ‘अल्ला का वास्ता’

Last Updated: Friday, June 29, 2012, 17:09

पाकिस्तानमधील भारतीय कैदी सरबजीतच्या सुटकेसाठी आता अभिनेता सलमान खानही पुढे सरसावला आहे. सलमाननं ट्विटरच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केलीय.

परराष्ट्रमंत्र्यांचं पाकला आवाहन

Last Updated: Wednesday, June 27, 2012, 14:49

भारतीय कैदी सरबजीत सिंगला पाकनं सोडून द्यावं, अशी मागणी आज भारत सरकारनं पाकिस्तानकडे केलीय.

'सरबजीत नव्हे, सुरजीतची होणार सुटका'

Last Updated: Wednesday, June 27, 2012, 13:17

सरबजीत सिंगच्या सुटकेवरुन मध्यरात्री पाकिस्ताननं यूटर्न मारलाय. गेल्या २२ वर्षांपासून पाकिस्तानातल्या जेलमध्ये खितपत पडलेल्या सरबजीत सिंगची सुटका होणार नाही. काल रात्री उशीरा राष्ट्राध्यक्षांच्या प्रवक्त्याने सरबजितची सुटका होणार नसून सुरजितसिंगला सोडण्यात येणार असल्याचा खुलासा केलाय.

सरबजीतचा पाचवा दयायाचना अर्ज

Last Updated: Thursday, May 31, 2012, 21:48

पाकिस्तानमध्ये बॉम्ब हल्ल्यांप्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेला भारतीय कैदी सरबजीत सिंग याने पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असीफ अली झरदारी यांच्याकडे नव्याने दयायाचना अर्ज दाखल केला आहे. सरबजीतने दयेसाठी दाखल केलेला हा पाचवा अर्ज आहे.