नग्न फोटोच्या टि्वटवर चिडली पूनम पांडे - Marathi News 24taas.com

नग्न फोटोच्या टि्वटवर चिडली पूनम पांडे

www.24taas.com
 
बांग्लादेशी लेखिका तस्लिमा नसरीने किंशफिशरची बोल्ड मॉडेल पूनम पांडे हिच्यावर टीका केली होती. त्याला पूनम पांडेनेही तस्लिमाला  प्रतिउत्तर दिलं आहे. पूनमने तस्लिमाला उत्तर देण्यासाठी टि्वट केलं आहे. - लोकं तुमच्याबाबत काय बोलत आहे, त्याची परवा करू नका. आपलं काम आपण करत राहा. असं होऊ शकतं की, काही कामासाठी लोकं तुम्हांला दुस्वास करतील, पण तुम्हांला त्या लोकांसाठी काम करायला हवं जे तुमच्यावर मनापासून काम करतात.
 
पूनमने टि्वट मध्ये असंही लिहलं आहे की, ती कोणालाही घाबरणार नाही, महिला याच इतिहास घडवत असतात. तिने तस्लिमाला सल्ला देत असं लिहलं की मला यश मिळविण्यासाठी मला कोणाचीही गरज नाहीये. मी माझ्या मेहनतीवर यश संपादन करू शकते.
 
पूनमच्या या टि्वटवर पुन्हा एकदा तस्लिमाने टि्वट केलं आहे. आणि त्यात तिने असं म्हटलं आहे की, माझं काम हे महिलांची अब्रु वाचणं हे आहे. आणि ते महत्त्वाचं देखील आहे. 'फुटकळ पब्लिसिटी' मिळविण्यासाठी नाही. तस्लिमाने याआधीही पूनमवर निशाणा साधला होता. की, पूनम पांडे याआधीही नग्न झालेली होती. पण अजूनही तिचं मन भरलं नाहीये असचं वाटतं.
 
 

First Published: Thursday, February 23, 2012, 13:43


comments powered by Disqus