मधुरला पासपोर्ट जमा करण्याचे आदेश - Marathi News 24taas.com

मधुरला पासपोर्ट जमा करण्याचे आदेश

झी २४ तास वेब टीम, मुंबई 
 
अंधेरी न्यायालयाने दिग्दर्शक मधुर भंडारकारला काल तीस हजार रूपयांचा जामीन मंजूर केला. मात्र, पासपोर्ट न्यायालयात जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
 
चित्रपटात काम देण्याचे अमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार प्रीती जैन हिने दाखल केली होती. हे प्रकरण सत्र न्यायालयात वर्ग होईपर्यंत पुराव्यांशी छेडछाड करू नये. आणि तपासाला सहकार्य करावे, अशा अटी घालून न्यायालयाने मधुरला जामीन मंजूर केला.
 
पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्याने प्रीती जैनने अंधेरी न्यायालयात धाव घेतली आहे. आपण निर्दोष असून ही तक्रार रद्दबातल ठरवावी, अशी मागणी करणारी याचिका मधुरने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर कोणतेही अंतरिम आदेश न देता न्यायालयाने शासनाला नोटीस जारी करून यावरील सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली. त्याचवेळी अंधेरी न्यायालयाने मधुरला हजर राहण्याचे आदेश दिले. त्यानुसार न्यायालयात हजर राहून मधुरने जामीनासाठी अर्ज केला होता.

First Published: Tuesday, November 15, 2011, 03:56


comments powered by Disqus