'झी सिने पुरस्कार' सोहळा रंगणार मकाऊमध्ये - Marathi News 24taas.com

'झी सिने पुरस्कार' सोहळा रंगणार मकाऊमध्ये

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
हिंदी चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा 'झी सिने पुरस्कार' पुढील वर्षी मकाऊमध्ये रंगणार आहे. या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन किंग खान आणि प्रियांका चोप्रा करणार आहेत.
 
२१ जानेवारी २०१२ला मकाऊमध्ये संपन्न होणारा हा सोहळा दर्शकांना ५ फेब्रुवारी रोजी झी टीव्हीवर पाहता येईल.  'झी सिने पुरस्कार'  सोहळ्याच्या सूत्रसंचालकांच्या नावांबाबत दरवर्षी दर्शकांबरोबरच कलाकारांमध्येही  प्रचंड उत्सुकता असते. यंदा सैफ-करीना, रणवीर-अनुष्का अशा अनेक जोडय़ांची नावे या सूत्रसंचालनासाठी चर्चेत होती.  याबाबत झी टीव्हीने अधिकृत घोषणा केली आहे. आता या सोहळ्यात बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान आणि चुलबुली गर्ल प्रियांका चोप्रा हे दोघे सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळतील.
 
गेल्या १३ वर्षांपासून लंडन, मलेशिया, दुबई, मॉरिशस, सिंगापूर अशा अनेक देशांमध्ये लोकप्रियता मिळवलेल्या या पुरस्कारांवर यंदा कोण शिक्का उमटवणार, याबाबत बॉलिवूडमध्येही उत्सुकता आहे.
 
गेल्या वर्षी प्रियांकाने सवरेत्कृष्ट चित्रपटांसाठीची नामांकने जाहीर करताना सहा वेगवेगळ्या अवतारांत एण्ट्री घेतली होती. तर शाहरूखने पत्नीवर कसं प्रेम करावे, याचे धडे हृतिक रोशनला दिले होते. दर्शकांना पुन्हा एकदा तीच मजा जास्त प्रमाणात अनुभवायला मिळणार आहे.
 

First Published: Sunday, November 20, 2011, 05:53


comments powered by Disqus