Last Updated: Sunday, April 20, 2014, 16:45
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई विराट कोहली आणि बॉलीवुड एक्ट्रेस अनुष्का शर्मा यांच्या प्रेम कहाणीत एक नवीन ट्वीस्ट आलेला दिसतोय. सध्या विराट हा अनुष्कापासून लांब आणि एक्ट्रेस इलियाना डि-क्रूजच्या जवळ दिसत आहे. `आयपीएल`च्या उद्घाटन सोहळ्यात शाहरुख खानने तर विराट आणि अनुष्काच्या लगनाचा घाट घातला होता. पण सध्याची खबर ऐकून त्यांच्या चाहत्यांना जरा दु:ख होऊ शकते.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे एका शॅम्पुच्या जाहिरातीत पहिल्यांदा दिसले होते. तेव्हा पासूनच हे दोघे एकमेकांसाठी आवश्यक तितका वेळ काढत असतात. पण ज्यावेळी अशी बातमी आली की शॅम्पुच्या नवीन जाहिरातीत विराट आणि अनुष्का नसणार आहेत. तेव्हा तर या दोघांचे चाहते नक्कीच नाराज झाले असतील.
सध्या अनुष्का ही `बॉम्बे वेल्वेट’या सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. म्हणुनच विराट सोबत या शॅम्पुच्या जाहिरातीत इलियाना डि-क्रूज झळकणार आहे.
शॅम्पु ब्रॅंडने हा बदल फक्त एकदाच करण्याचे ठरवले आहे. तसेच कॉन्ट्रेक्ट संपेपर्यंत अनुष्का हीच ब्रॅंडची ब्रॅंड अॅम्बेसेडर बनून राहणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, April 20, 2014, 16:45