Last Updated: Saturday, May 11, 2013, 07:58
www.24taas.comलैंगिंक शिक्षण ही काळाची गरज आहे. वास्तव म्हणजे `सेफ सेक्स" काय, "लो रिस्क बिहेव्हिअर" कशाला म्हणतात. शारीरीक संपर्काशिवाय किंवा अगदी अचूक सांगायचे झाले तर "बॉडी फ्लुईड एक्स्चेंज" शिवाय आनंद कसा मिळवायचा आदिची माहीती देणे आदि "लैगिक शिक्षणांतर्गत" अंतर्भूत नाही काय? शिक्षक-पालक साधारण कधी ही माहीती देतात? आणि देत नसतील तर हे आवश्यक नाही का?
आपल्या पार्टनर सोबत प्रामाणिकता किती महत्त्वाची आहे हे पटवून देणं महत्त्वाचं आहे. एक मूल्य यापेक्षा व्यावहारीक स्तरावर किती महत्त्वाचे आहे याचा कशी उहापोह झालेला माझ्या माहीतीत नाही. नैतिक मूल्य-मूल्य म्हणून ती डोक्यावर घेतलेली गोष्ट आहे पण त्याच गोष्टीला जबरदस्त व्यावहारीक मूल्य आहेच हे कधी हायलाईट होत नाही.
मुलांशी मनमोकळेपणाने बोलणे हे नैतिकतेइतकेच किंबहुना जास्त व्यावहारीक पातळीवरुन व्हायला पाहीजे. मुलांची मानसिकता समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे योग्य वयात मुलांना मार्गदर्शन मिळणं महत्त्वाचं आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, May 11, 2013, 07:53