बॉडी बिल्डिंगचे भोक्ते असतात सेक्सबद्दल आक्रमक - Marathi News 24taas.com

बॉडी बिल्डिंगचे भोक्ते असतात सेक्सबद्दल आक्रमक

www.24taas.com, वॉशिंग्टन
 
बॉडी बिल्डिंगचं वेड असणारे पुरूष मनातून सेक्ससाठी अधीर असतात, असा निष्कर्ष नुकत्याच एका संशोधनातून समोर आला आहे. मात्र बॉडी बिल्डिंग करणाऱ्या पुरूषांची वर्तणूक स्त्रियांच्या बाबतीत जास्तच आक्रमक असते. त्यामुळे स्त्रियांच्या मनात अशा पुरूषांबद्दल नकारात्मक स्वरुपाचं आकर्षण असतं.
 
ब्रिटनमधील यनिव्हर्सिटी ऑफ वेस्टमिन्स्टरमध्ये डॉ. वीरेन स्वामी यांच्या अध्याक्षतेखाली चालू असलेल्या संशोधनातून हे निष्कर्ष समोर आले आहेत. बॉडी बिल्डिंगद्वारे पुरूष सेक्सी दिसायचा प्रयत्न करत असतात आणि स्त्रियांच्या नजरेत आकर्षक दिसण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, पुरूषांचं असं मर्दानी रुक्ष स्वरूप बऱ्याच वेळा महिलांवर नकारात्मक छाप पाडतं आणि ऑफिसमध्ये काम करताना याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
 
प्रो. स्वामी म्हणाले, “आधी लक्षात आलं की बारीक अंगकाठीच्या स्त्रिया आकर्षक असतात. पण आता असं लक्षात आलं की शरीरसौष्ठव कमावणारे पुरूषांना सेक्सची इच्छा अधिक असते आणि ते स्त्रियांच्या नजरेत आपलं नर असणं ठासवण्यासाठी शरीर कमावतात.”

First Published: Friday, June 29, 2012, 19:11


comments powered by Disqus