Last Updated: Wednesday, December 12, 2012, 17:53
www.24taas.com, वॉशिंग्टनवॉशिंग्टन विद्यापीठामध्ये संशोधनाअंती अशा प्रकारचं कंडोम तयार करण्यात संशोधकांना यश आलं आहे, जे एचआयव्हीची लागण आणि अवांछित गर्भधारणेपासून महिलांचा बचाव करतं. हे कंडोम शरीरसंबंधांनंतर महिलांच्या शरीरात विरघळून जातं. ‘डेली मेल’ या वृत्तपत्राने दिलेल्या रिपोर्टनुसार हे कंडोम विकसित करण्यासाठी संशोधन पथकाला 10 लाख डटलर्सचं अर्थसहाय्य केलं गेलं आहे.
नव्याने शोधलेलं कंडोम हे शरीरसंबंधांमध्ये वीर्य गर्भाशयात जाण्यापासून अडवतं. पण याचसोबत महिलांच्या शरीरात विरघळून जात एचआयव्हीपासून वाचवणारी आणि गर्भनिरोधक औषधंही शरीरात सोडतं. अर्थात या दोन वेगळ्या समस्यांवर स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली गेल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे.
या कंडोममध्ये औषधं तंतुरूपात असून ती शरीरात मिसळतात. त्यांचं नॅनो फायबरमध्ये रुपांतर होतं. हे तंत्रज्ञान इलेक्ट्रोस्पिनिंग तंत्रज्ञानावर आधारलेलं आहे.
First Published: Wednesday, December 12, 2012, 17:53