Last Updated: Tuesday, June 18, 2013, 17:42
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईराज्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. ठाणे जिल्ह्याला गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसान चांगलचं झोडपून काढलय. कल्याण-डोंबिवली, बदलापूर परिसरात संततधार सुरुय.
अंबरनाथमध्ये 70 घरांमध्ये पाणी शिरलय. उल्हासनगरलाही पावसाचा फटका बसला असून, अनेक घरांत पाणी शिरलय. लोणावळ्यातही गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आतापर्यंत गेल्या वर्षाच्या तुलनेत चौपट पाऊस बरसलाय. याचा लोणावळ्याच्या जनजीवनावर परिणाम झालाय. शहरातून जाणा-या मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र.4 वरची वाहतूकही थंडावलीय. लोणावळयातला भुशी डॅम दोन दिवसांपुर्वीच ओव्हरल्फो झाला.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळं जिल्ह्यातल्या नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झालीय. पंचगंगेच्या पातळीत वाढ झाल्यानं राजाराम बंधारा पाण्याखाली गेलाय.
First Published: Tuesday, June 18, 2013, 17:42