Last Updated: Tuesday, June 11, 2013, 00:06
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईउपमुख्यमंत्री अजित पवार `वर्षा`वर दाखल झाले आहेत. नव्या मंत्र्यांची यादी सादर करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा उद्या सकाळी साडे अकरा वाजता शपथविधी होणार आहे.
विद्यमान प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांची मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याचं निश्चित मानण्यात येतंय. इतरांची मात्र यादी अजून तयार झालेली नाही. त्यामुळं इतर इच्छूक अजूनही गॅसवर आहेत. कोणत्या मंत्र्यांना लॉटरी लागणार आणि कुणाला डच्चू मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी अनपेक्षित चेहरा असणार आहे अशी माहिती पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, June 11, 2013, 00:06