Last Updated: Tuesday, June 11, 2013, 08:52
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा आज सकाळी साडे अकरा वाजता शपथविधी होणार आहे. राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडेल. दरम्यान, रात्री उशिरा अजितपवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शपथविधी घेणाऱ्या मंत्र्यांची नावे आणि वगळलेल्या मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्र्यांकडे सादर केल्याची माहिती सुत्रांकडून कळतीय.
नव्या मंत्र्यांमध्ये मधुकर पिचड शशिकांत शिंदे यांची वर्णी लागलीय तर कोकणातून उदय सामंत या नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आलीय. त्याचबरोबर संजय सावकारे आणि दिलीप सोपल यांचीही नावे पुढे आहेत. बबनराव पाचपूते आणि रामराजे निंबाळकर यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं असून त्यांच्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
रामराजे निंबाळकर यांची लोकसभेसाठी वर्णी लागण्याची शक्यता आहे. भास्कर जाधव यांनाही मंत्री मंडळातून वगळण्यात आलं असून त्यांनाही पक्षात नवी जबाबदारी देण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. लक्ष्मण ढोबळे आणि गुलाबराव देवकर यांनाही मंत्री मंडळातून डच्चू मिळाल्याचं बोललं जातंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, June 11, 2013, 08:52