राष्ट्रीय महामार्गावर सीसीटीव्ही!, CCTV on National Highway

राष्ट्रीय महामार्गावर सीसीटीव्ही!

राष्ट्रीय महामार्गावर सीसीटीव्ही!
www.24taas.com, मुंबई

राज्यातील सर्व राष्ट्रीय महामार्गावर सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. अपघात रोखण्यासाठी आणि अपघातातील जखमींवर त्वरीत उपचार व्हावेत.

यासाठी हायवेवरच्या पथदिव्यांवर सीसीटीव्ही बसवण्याचा आदेश न्यायमूर्ती अजय खानविलकरांनी एका याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान दिला आहे. तसंच यापुढं हायवेची बांधणी करताना किंवा दुरुस्ती करताना सीसीटीव्ही बसवण्याचा मुद्दाही समाविष्ट करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

सीसीटीव्ही बसवल्यामुळं अतिवेगानं जाणा-या गाड्यांवरही नियत्रंण ठेवता येणार असल्यानं आपोआपच अपघातांची संख्याही कमी होईल. अशी अपेक्षा कोर्टानं व्यक्त केली आहे.

First Published: Thursday, February 28, 2013, 22:55


comments powered by Disqus