Last Updated: Tuesday, January 28, 2014, 20:52
www.24taas.com , झी मीडिया , पुणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा गुन्हा कबुल करावा, यासाठी आपल्याला २५ लाखांची ऑफर दिलेली आहे. गृहमंत्री आर आर पाटील यांच्या सांगण्यावरूनच आपल्याला या प्रकरणी पोलिसांकडून गोवण्यात येत आहे, असा दावा करणारे मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांनी आपल्या वक्तव्याचा इन्कार केला आहे. पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळेच आपण असे वक्तव्य केले होते. मात्र कोणाकडून कुठलीच ऑफर आपल्याला मिळालेली नाही. पोलिसांच्या मारहाणीला कंटाळून आपण केवळ रागातून असे वक्तव्य केल्याचं आरोपींनी कबुल केलयं .
मनीष नागोरी आणि विकास रामअवतार खंडेलवालने गेल्या आठवड्यात एटीएस प्रमुख राकेश मारिया यांच्यावर आरोप केला होता की, गुन्हा कबुल करण्यासाठी मारिया यांनी आपल्याला २५ लाखांचे अमिष दाखवले होते .परंतु आज कोर्टात आरोपीनीं घुमजाव केल.
पुण्यातील कोर्टात या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. पुणे कोर्टाने आज त्यांच्या पोलीस कोठडीत ४ फेब्रुवारीपर्यंत वाढ केली आहे.
दाभोलकर हत्याकांडात वापरण्यात आलेले पिस्तुल आणि खंडेलवालकडे सापडलेले पिस्तुल एकच असल्याचे पुण्याच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त शहाजी सोळुंके यांनी यापुर्वीच स्पष्ट केल होतं. बॅलेस्टीक रिपोर्टमध्ये ही बाब सिद्ध झाली आहे. आरोपींकडून बचावासाठी असे आरोप केले जातात. आम्ही आमच काम करत राहू, असं मत अतिरिक्त आयुक्त शहाजी सोळुंके यांनी व्यक्त केलयं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, January 28, 2014, 20:52