Last Updated: Saturday, April 27, 2013, 13:24
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईदुष्काळानं होरपळलेल्या बळीराजासाठी खुषखबर. यंदाचा मान्सून सामान्य राहणार असल्याची माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री जयपाल रेड्डी यांनी दिलीय.
मात्र दक्षिण भारतातल्या राज्यांमध्ये मान्सूनचे उशिराने आगमन होणार आहे. त्यामुळं केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये पावसाचे प्रमाणही कमी राहण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात भारतीय हवामान अंदाज विभागानं यंदाचा मान्सून सामान्य राहणार असल्याचं भाकीत वर्तवलंय.
या भाकीताची माहिती केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिली होती. त्यामुळं दुष्काळानं होरपळलेल्या शेतक-यांना आणि पाणी टंचाईनग्रस्त असलेल्या राज्याला आगामी पावसाळ्यात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
First Published: Saturday, April 27, 2013, 13:24