Last Updated: Thursday, August 16, 2012, 21:40
www.24taas.com,मुंबई
महागाईने आधीच होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांना आता वीज दरवाढीचा झटका सहन करावा लागणार आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.ने राज्यात वीज दरवाढ लागू केली आहे.
प्रत्येक युनिटमागे 25 ते 50 पैशांची वाढ केली जाणार आहे. ही दरवाढ एक ऑगस्टपासून लागू करण्यात येणार आहे. आर्थिक स्थिती कोलमडल्याचे कारण पुढे करत महावितरणने दरवाढीची मागणी केली होती.
वीज नियामक मंडळाने महावितरणची ही दरवाढ मंजूर केली आहे. त्यामुळे आता सामान्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडणार आहे.
First Published: Thursday, August 16, 2012, 21:40