पुण्याच्या आणखी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश... , one more sex racket in pune

पुण्याच्या आणखी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश...

पुण्याच्या आणखी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश...

www.24taas.com, वृत्तसंस्था, पुणे

दोन युवतींकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याच्या आरोपावरून एका महिलेला अटक करण्यात आली आहे. शुभांगी विजय जोशी असे अटक झालेल्या महिलेचे नाव आहे. शुभांगी विजय जोशीचे वय ३० वर्षे असून पुण्याच्या आंबेगाव बु्द्रुक येथे वास्तव्यास आहे. अशाच प्रकारचे रॅकेट चालवल्याप्रकरणी २९ वर्षीय अशोक उत्तम देवगडे याला देखील अटक करण्यात आली आहे. अशोक देवगडे हा भोसरी येथे हे रॅकेट चालवत होता. भारती विद्यापीठ परिसरात एका फ्लॅटमध्ये हे रॅकेट चालवले जात आहे अशी माहिती मिळाल्यावर बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी शहानिशा करून घेतली. त्यात चौकशी दरम्यान महाविद्यालयीन तरूणींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना अनैतिक कामासाठी प्रवृत्त केले जात आहे ही बाब स्पष्ट झाली.

आर्थिक विवंचनेत असलेल्या महाविद्यालयीन तरूणीना पैश्याचे अमिष दाखवून लक्ष्य केले जात आहे. पुणे पोलीस गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने आंबेगाव आणि भोसरी या ठिकाणी ही कारवाई केली. त्यात तीन उच्चशिक्षीत तरूणींची सुटका करण्यात आली. सुटका करण्यात आलेल्या तरूणी महाराष्ट्रीयन आहेत.

पुण्याच्या कोथरूडमधील भुसारी कॉलनीतील प्रकरण, कोरेगाव पार्क पाठोपाठ पुण्याच्या भारती विद्यापीठ परिसरात आणखी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलीसांना यश आले.






इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, January 22, 2014, 19:03


comments powered by Disqus