ऑपरेशन हवाला : मोईन कुरेशीचा पर्दाफाश, हवाला रॅकेटचे संबंध १० जनपथपर्यंत

Last Updated: Thursday, April 17, 2014, 09:05

चार मोठे केंद्रीय मंत्री आणि नेत्यांच्या हवाला कनेक्शनचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केलाय `झी मीडिया`नं... मोईन कुरैशी नावाच्या एका मांस निर्यातदाराच्या माध्यमातून सुरू होता हा करोडो रूपयांचा हवाला कारभार... आम्ही करतोय त्याचा पर्दाफाश...

पुण्याच्या आणखी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश...

Last Updated: Wednesday, January 22, 2014, 19:03

दोन युवतींकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याच्या आरोपावरून एका महिलेला अटक करण्यात आली आहे. शुभांगी विजय जोशी असे अटक झालेल्या महिलेचे नाव आहे. शुभांगी विजय जोशीचे वय ३० वर्षे असून पुण्याच्या आंबेगाव बु्द्रुक येथे वास्तव्यास आहे. अशाच प्रकारचे रॅकेट चालवल्याप्रकरणी २९ वर्षीय अशोक उत्तम देवगडे याला देखील अटक करण्यात आली आहे. अशोक देवगडे हा भोसरी येथे हे रॅकेट चालवत होता. भारती विद्यापीठ परिसरात एका फ्लॅटमध्ये हे रॅकेट चालवले जात आहे अशी माहिती मिळाल्यावर बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी शहानिशा करून घेतली

नवीन वॉचमन ठेवताय?... सावधान!

Last Updated: Tuesday, December 10, 2013, 22:09

वॉचमनची नोकरी करत सहा महिने किवा वर्षभरात मालकाचा विश्वास संपादन करायचा आणि मग त्याच्याच घरावर डल्ला मारायचा, अशी धक्कादायक मोडस ऑपरेंडी आहे नेपाळी वॉचमनच्या एका टोळीची... कल्याणमध्ये नुकताच हा प्रकार उघडकीस आलाय.

कृष्णा खोरे चौकशी अहवाल ‘गायब’

Last Updated: Tuesday, September 24, 2013, 12:17

कृष्णा खोरे विकास महामंडळातील हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा पर्दाफाश करणारा चौकशी अहवालच गायब झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलाय.

वाघाच्या शिकारी टोळीचा पर्दाफाश

Last Updated: Saturday, June 15, 2013, 07:37

वाघाची शिकार करणा-या बहेलिया समाजाच्या एका टोळीचा पर्दाफाश झाला असून, विदर्भात या टोळीने गेल्या काही वर्षात हैदोस माजवत अनेक वाघांचं शिकार केल्याची आता उघडकीस येतंय.

घरगुती जाचाला कंटाळलेल्या महिलांवर दलालांची नजर...

Last Updated: Monday, March 4, 2013, 10:39

चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा शहरातून महिला आणि मुली विकण्याऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. वरोऱ्यातल्या एका महिलेमुळे पोलिसांना या रॅकेटचा पर्दाफाश करता आला.

३० ते ५० लाख रुपये भरा आणि डॉक्टर व्हा!

Last Updated: Friday, January 18, 2013, 22:43

भ्रष्टाचाराची परिसिमा गाठत असलेल्या महाराष्ट्रातल्या एका मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश आज `झी २४ तास’नं केलाय. हा घोटाळा आहे वैद्यकिय प्रवेश प्रक्रियेचा. डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या अनेक गरीब घरातल्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा कसा चक्काचूर होतो, ते यातून स्पष्ट झालंय. गुणवान विद्यार्थ्यांना डावलून धनदांडग्यांना प्रवेश देणाऱ्या संस्थाचालकांच्या कृत्याचाही आम्ही पर्दाफाश केलाय.

कत्तलखान्याचा पर्दाफाश... दलालांना रंगेहाथ अटक

Last Updated: Monday, October 22, 2012, 18:41

मुंबई महापालिकेच्या देवनार कत्तलखान्यात बकरी ईदसाठी आणलेल्या बकऱ्या मेंढ्याची बेकायदेशीर विक्री उघड झालीय. हा पर्दाफाश केलाय, विरोधी पक्ष नेते ज्ञानराज निकम यांनी.

चांदण्या पाठीच्या कासवामुळं तस्करीचा पर्दाफाश

Last Updated: Saturday, September 1, 2012, 00:10

नाशिक जिल्ह्यात सध्या कासवं, घुबडं यांची अंधश्रद्धेपोटी तस्करी होतेय. कोट्यवधी रुपयांची उलाढाल या व्यवहारातून होते. नाशिक जिल्ह्यातल्या ओझरमध्ये या कासवाची विक्री होत होती. त्याचवेळी पोलिसांनी छापा टाकला आणि पुढचा अनर्थ टळला.

मुंबईत भेसळयुक्त दूधाच्या रॅकेटचा पर्दाफाश

Last Updated: Wednesday, May 30, 2012, 16:04

मुंबईतली भेसळयुक्त दुधानं मुंबईकर हैराण आहेत. मुंबईतल्या पवईमध्ये काही जागरूक नागरिकांनीच दुधाची भेसळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

सेनेच्या बेगडी मराठीप्रेमाचा पर्दाफाश!

Last Updated: Thursday, May 17, 2012, 21:58

एरव्ही मराठीचा घोषा लावणारी शिवसेनेचं मराठीप्रेम कीती बेगडी आहे, याचा नमुनाच औरंगाबादेत पहावयास मिळतोय. गेल्या 15 वर्षांपासून औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे, मात्र औरंगाबादेत सगळीकडेच दुकानावर इंग्रजी पाट्या दिसतात.