Last Updated: Thursday, February 14, 2013, 20:54
www.24taas.com, मुंबईदहावी आणि बारावीच्या परीक्षांवरील संकट अजूनही कायम आहे. कारण खासगी शिक्षण संस्थाचालकांच्या बैठकीत कुठलाच तोडगा निघू शकलेला नाही. दहावी आणि बारावी परिक्षेसाठी केंद्र न देण्याच्या निर्णयावर संस्थाचालक ठाम आहेत.
सरकार आता खासगी शिक्षण संस्थाचालकांना लेखी कळवणार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाची 18 फेब्रुवारीला बैठक होणार असून याबाबतचा पुढील निर्णय होणार आहे. मात्र या बहिष्कारामुळे साडेतीन ते चार हजार शाळांमधील परीक्षा केंद्र बंद राहण्याची भीती आहे. वेतनेतर अनुदानात कपात करण्याच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आला आहे.
तसंच अनुदान वेळेवर मिळत नसल्याचाही महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संघटनेचा आरोप आहे. यामुळे परीक्षेचं वेळापत्रक मोठ्या प्रमाणात कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे.
First Published: Thursday, February 14, 2013, 20:54