Last Updated: Wednesday, May 16, 2012, 15:51
www.24taas.com, गोंदियाविदर्भातील गोंदिया जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. दरेकसा तालुक्यातील टोयागोंदी ग्रामपंचायतीचं कार्यालय जाळून टाकण्यापर्यंत आज नक्षलवाद्यांची मजल गेलीय. त्याचबरोबर याच परिसरातील मोबाईल कंपनीचा टॉवरही नक्षलवाद्यांनी जाळून टाकलाय.
दोनच दिवसांपूर्वी जिल्ह्यातल्या दमदीटोला गावाच्या सीमेजवळ नक्षलवाद्यांनी आखलेला घातपातचा कट हाणून पाडला होता. यावेळी घटनास्थळावरून तब्बल १६ किलो अमोनियम नायट्रेटचा साठा जप्त केला होता. तसंच १० मे रोजी इस्तारी गावाचे सरपंच घनश्याम पोरेट्टी यांची नक्षलवाद्यांकडून हत्या करण्यात आली होती.
आज नक्षलवाद्यांचा हा पूर्वनियोजित कट हाणून पाडण्यास मात्र पोलिसांना अपयश आलं. या घटनेत जीवितहानी मात्र झाली नाही. पण, स्थानिक नागरिकांत दहशत पसरवण्यात मात्र नक्षलवादी यशस्वी झालेत.
First Published: Wednesday, May 16, 2012, 15:51