अखेर गुलाबराव देवकर यांना अटक - Marathi News 24taas.com

अखेर गुलाबराव देवकर यांना अटक

www.24taas.com, जळगाव
 
जळगावमधल्या घरकुल घोटाळ्याप्रकऱणी आरोपी असलेले परिवहन राज्यमंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना अटक अखेर करण्यात आलीय. शनिवारच्या चौकशीला गैरहजर राहिलेल्या गुलाबराव देवकरांनी आज पोलिसांसमोर शरणागती पत्करली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यामुळं आता ते राजीनामा कधी देणार याबाबतची चर्चा रंगात आलीय.
 
देवकर हे घरकुल घोटाळ्यातले प्रमुख आरोपी असून तत्कालीन नगराध्यही आहेत. 29 कोटी 59 लाख रुपयांच्या या घोटाळ्यात अटक झालेले दुसरे मोठे दिग्गज आहेत. यापूर्वी शिवसेना आमदार सुरेश जैन यांना अटक करण्यात आली होती. तर शनिवारी चौकशीला हजर असलेल्यांपैकी 25 आजी माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना अटक करण्यात आली होती. यात 15 जणांना जामीन मंजूर करण्यात आला होता, तर 10 जणांचा जामीन फेटाळण्यात आला होता.

First Published: Monday, May 21, 2012, 14:15


comments powered by Disqus