जळगाव महापालिका : मतमोजणी सुरू

Last Updated: Monday, September 2, 2013, 12:38

जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी मतमोजणी सुरू झालीय. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, मनसे, तसंच खान्देश विकास आघाडीने यासाठी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावलीय.

गुलाबरावांवर आरोप निश्चित, खुर्ची अनिश्चित!

Last Updated: Monday, May 27, 2013, 17:08

जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी पालकमंत्री आणि राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह ४८ नगरसेवकांवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. तर मुख्य आरोपी आणि आमदार सुरेश जैन यांच्या गैरहजेरीबाबत २९ मे रोजी सुनावणी होणार आहे

राज ठाकरेंचा निशाणा कोणावर?

Last Updated: Saturday, April 6, 2013, 18:07

आपल्या उत्तर महाराष्ट्रातल्या दौ-यात जळगावमधील जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे कुणाकुणाचा समाचार घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

देवकरांचा राज्यमंत्रिपदाचा राजीनामा

Last Updated: Wednesday, August 8, 2012, 03:00

अखेर जळगाव घरकूल घोटाळा गुलाबराव देवकरांना भोवडलंय. घोटाळ्यातले मुख्य आरोपी देवकरांनी अखेर परिवहन राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलाय.

देवकरांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा

Last Updated: Tuesday, August 7, 2012, 15:03

जळगाव घरकूल घोटाळ्याप्रकरणी अटक टाळण्यासाठी परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांची धावाधाव सुरू झालीय. औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाविरोधात देवकारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय.

देवकरांना पुन्हा अटक होणार?

Last Updated: Monday, August 6, 2012, 17:18

जळगाव घरकूल घोटाळा प्रकरणी परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर पुन्हा अडचणीत आले आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आरोप असल्यानं, देवकरांना पुन्हा अटक करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत.

वाघुर पाणी घोटाळा : गुलाबराव देवकरही अडचणीत

Last Updated: Sunday, July 29, 2012, 20:51

जळगावमध्ये घरकुल घोटाळ्यानंतर आता वाघूर पाणी योजना घोटाळा उघडकीस आलाय. या घोटाळ्यात सुरेश जैन यांच्या पाठोपाठ परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकरही गोत्यात आलेत. दोघांविरोधात गुन्हे दाखल झाल्यानं त्यांच्या अटकेची शक्यता व्यक्त होत आहे.

‘देवकरांनी राजीनामा द्यावा’

Last Updated: Tuesday, May 22, 2012, 16:12

घरकुल घोटाळ्यांत अटक झालेल्या आणि नंतर जामीन मिळालेल्या राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलीय.

राज्यमंत्री देवकरांना जामिन मंजूर

Last Updated: Monday, May 21, 2012, 19:03

जळगावातील घरकुल घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेले राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना अटक केल्यानंतर लगेचच जामीन मंजूर झाला आहे. कोर्टाने देवकर यांना ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन दिला आहे.

अखेर गुलाबराव देवकर यांना अटक

Last Updated: Monday, May 21, 2012, 14:15

जळगावमधल्या घरकुल घोटाळ्याप्रकऱणी आरोपी असलेले परिवहन राज्यमंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांना अटक अखेर करण्यात आलीय.

सुरेशदादा जैन यांना अटक

Last Updated: Sunday, March 11, 2012, 07:39

शिवसेनेचे आमदार सुरेशदादा जैन यांना अटक करण्यात आली आहे. जळगाव नगरपालिकेतील २९ कोटी ५९ लाख रुपयांच्या घरकुल घोटाळ्या प्रकरणातील सहभागा प्रकरणी सुरेशदादा जैन यांना अटक करण्यात आली आहे.

घरकुल घोटाळा : महापौरही संशयित आरोपी

Last Updated: Tuesday, February 21, 2012, 20:24

जळगावमधल्या २९ कोटी ५९ लाखांच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी जळगावचे महापौर सदाशिव ढेकळेंची एक तास कसून चौकशी करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक तसंच घोटाळ्याचे तपास अधिकारी इशू सिंधू यांनी त्यांची चौकशी केली.

जळगावात देवकरांच्या कार्यकर्त्यांना अटक

Last Updated: Tuesday, February 7, 2012, 10:30

जळगावचे पालकमंत्री गुलाबराव देवकरांच्या भावासाठी पैसे वाटताना राष्ट्रवादीच्या 3 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.

घरकुल घोटाळ्याप्रकरणी देवकरांची चौकशी

Last Updated: Thursday, February 2, 2012, 14:46

राज्य परिवहन राज्यमंत्री गुलाबराम देवकर यांची घरकुल घोटाळ्या प्रकरणी पोलिस चौकशी करण्यात आली. पोलिस अधिक्षक कार्यालयात चौकशी करण्यात आली. घरकुल घोटाळा तब्बल २९ कोटी ५९ लाखांचा आहे.