‘देवकरांनी राजीनामा द्यावा’ - Marathi News 24taas.com

‘देवकरांनी राजीनामा द्यावा’

www.24taas.com, मुंबई
घरकुल घोटाळ्यांत अटक झालेल्या आणि नंतर जामीन मिळालेल्या राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलीय.
 
आदर्श घोटाळ्यात नाव आल्यानंतर अशोक चव्हाणांचा राजीनामा घेतला जातो. मग देवकरांना अटक होऊनही थेट राजीनामा का नाही? असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला आहे. अटकेनंतर देवकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवण्याऐवजी न्यायालयीन प्रक्रियेची वाट पाहत पक्षाकडे राजीनामा पाठवण्याची चाल खेळली. विशेष म्हणजे पक्षानंही त्यांचा तातडीनं राजीनामा घेण्याचं टाळलं. या प्रक्रियेत आघाडी सरकारची अब्रू चव्हाट्यावर आलीय.
 
देवकर हे घरकुल घोटाळ्यातले प्रमुख आरोपी असून तत्कालीन नगराध्यही आहेत.  29 कोटी 59 लाख रुपयांच्या या घोटाळ्यात अनेक बडी धेंडं अडकल्याचा संशय आहे.

First Published: Tuesday, May 22, 2012, 16:12


comments powered by Disqus