Last Updated: Friday, May 25, 2012, 13:24
www.24taas.com, मुंबई ज्या टंचाईग्रस्त गावांची आणेवारी पन्नास पैशांपेक्षा जास्त आहे अशा गावांमध्ये चारा डेपो सुरु करण्याचे अधिकार जिल्हाधिका-यांना देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे.
आणेवारीच्या निकषांमुळं अनेक गावांना चारा डेपो मिळत नव्हते. या आदेशानं जिल्हाधिका-यांना चारा डेपो उघडण्याचे विशेष अधिकार देण्यात आलेत. क वर्ग नगरपालिकांमध्येही टँकरनं पाणीपुरवठा करण्याचे अधिकार जिल्हाधिका-यांना देण्यात आलेत. पाणी पुरवठ्याचे निकषही बदलण्यात आलेत.
ग्रामीण भागासाठी दरडोई वीस लिटर पाणी देण्यात येत होतं. आता हीच मर्यादा वाढवून दरडोई तीस लिटर पाणी पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आलेत. पाणी पुरवठा करणा-या टँकरवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारीही जिल्हाधिका-यांवर टाकण्यात आलीये
First Published: Friday, May 25, 2012, 13:24