राज्यात मान्सून आला रे... - Marathi News 24taas.com

राज्यात मान्सून आला रे...

www.24taas.com, रत्नागिरी
 
राज्यात मान्सूनचं आगमन झालं आहे. कोकण किनारपट्टीवर एक दिवस आधीच मान्सून धडकला आहे. रत्नागिरीच्या हरणेला मान्सूनचं आगमन झालं असून साताऱ्यातही पावसाच्या सरी बरसल्या आहेत.
 
पुढील दोन दिवसांत विदर्भ आणि मराठवाड्यात पोहचणार असल्याची अंदाजही वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीपुळेच्या समुद्र किनाऱ्यावर उंचच उंच लाटांनी थैमान घातले.
 
या लाटांमुळे किनाऱ्यावरच्या दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पौर्णिमेच्या भरतीमुळे किनाऱ्यावर मोठ्या लाटा आल्या आहेत.
 
 
 
 

First Published: Wednesday, June 6, 2012, 16:08


comments powered by Disqus