घरकूल घोटाळा; मास्टरमाईंड सुरेश जैन - Marathi News 24taas.com

घरकूल घोटाळा; मास्टरमाईंड सुरेश जैन

 www.24taas.com, जळगाव
 
जळगावातला बहुचर्चित घरकूल घोटाळ्यामागचं मास्टरमाईंड सुरेश जैन यांचंच असल्याची कबुली या घोटाळ्यातील एका आरोपीनं दिलीय. त्यामुळे महाराष्ट्रातली एक वजनदार व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे सुरेश जैन पुन्हा एकदा अडचणीत आलेत.
 
जळगावातला २९ कोटी ५९ लाखांचा घरकूल घोटाळ्याचा संपूर्ण कट आमदार सुरेश जैन यांनीच शिजवला, असा गौप्यस्फोट गुन्ह्यातील आरोपी प्रदीप रायसोनी यांनी केलाय. रायसोनी हे जळगावचे माजी महापौर आहेत. घरकूल घोटाळ्यातल्या आरोपींच्या जामिनावर एकीकडे न्यायालयात सुनावणी सुरू असताना खटल्याच्या आरोपपत्रात प्रती आरोपींना देण्यात आल्या त्यासोबत जोडलेल्या रायसोनी यांच्या कबुलीजबाबात ही माहिती समोर आली आहे.
 
युती सरकारच्या काळात गृहनिर्माण मंत्रीपदी असताना जैन यांनी त्यांच्या बंगल्यावर मिटींग बोलावून घरकूल योजनेला विरोध न करण्याचा आदेश सदस्यांना दिला होता. तसंच बांधकामाचा ठेका हा केवळ खान्देश बिल्डरला देण्याचा आदेशही सदस्यांना दिला होता, असंही प्रदीप रायसोनी यांनी आपल्या कबुलीजबाबात म्हटलंय.
 
.

First Published: Wednesday, June 6, 2012, 20:55


comments powered by Disqus