सुरेश जैन यांचा जेलचा मुक्काम वाढला

Last Updated: Monday, October 7, 2013, 13:52

जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकऱणी आमदार सुरेश जैन यांचा जेलमधला मुक्काम वाढलाय. जैन यांनी वर्षभर कोणत्याही कोर्टात जामीनासाठी अर्ज करू नये असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत.

सुरेश जैन यांच्या पतंगानं घेतली भरारी!

Last Updated: Monday, September 2, 2013, 14:38

घरकुळ घोटाळ्यासंदर्भात कारागृहात असलेले सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीनं सर्वाधिक ३३ जागांवर विजय मिळवत जळगाव महापालिका निवडणुकीत सरशी मिळवलीय. सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा ३६ असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

जळगाव महापालिका : मतमोजणी सुरू

Last Updated: Monday, September 2, 2013, 12:38

जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी मतमोजणी सुरू झालीय. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, मनसे, तसंच खान्देश विकास आघाडीने यासाठी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावलीय.

सुरेश जैन यांना पुन्हा जमीन नाकारला

Last Updated: Tuesday, July 9, 2013, 17:57

जळगाव घरकूल घोटाळ्याप्रकरणी आमदार सुरेश जैन यांचा जामीन पुन्हा फेटाळण्यात आलाय.

घरकुल घोटाळा : सुरेश जैनांचा जामीन अर्ज फेटाळला

Last Updated: Wednesday, February 13, 2013, 19:57

आमदार सुरेश जैन यांचा जामीन अर्ज आज बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला त्यामुळे जैन यांची डोकेदुखी वाढली आहे. घरकुल घोटाळ्यातील संशयित आरोपी म्हणून जैन यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय.

सुरेश जैन यांचा जामीन अर्ज फेटाळला

Last Updated: Monday, December 17, 2012, 18:10

जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी सुरेश जैन यांचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं फेटाळलाय. या घोटाळ्यातील 53 आरोपींविरोधात दोषारोप निश्चित करा असे निर्देशही जळगाव कोर्टाला देण्यात आलेत.

सुरेश जैनांची रवानगी होणार आर्थर जेलमध्ये

Last Updated: Tuesday, October 30, 2012, 19:21

आरोपाच्या फे-यात अडकलेल्या आमदार सुरेश जैन यांना कोर्टानं दणका दिलाय. जैन यांची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करा असे आदेश जिल्हा सत्र न्यायालयानं दिलेत.

सुरेशदादांचा ७०० कोटींचा नवा घोटाळा!

Last Updated: Tuesday, October 30, 2012, 14:28

घरकुल घोटाळ्यात अडचणीत आलेल्या सुरेश जैन यांच्याविरोधात अपहाराचा आणखी एक गुन्हा दाखल झालाय. घरकुल, वाघुर पाणीपुरवठा योजना घोटाळा यासंदर्भातील आरोप त्यांच्यावर आहेच. आता त्यात आणखी नव्या घोटाळ्यांची भर पडली आहे.

घरकूल घोटाळा; मास्टरमाईंड सुरेश जैन

Last Updated: Wednesday, June 6, 2012, 20:55

जळगावातला बहुचर्चित घोटाळ्यामागचं मास्टरमाईंड सुरेश जैन यांचंच असल्याची कबुली या घोटाळ्यातील एका आरोपीनं दिलीय. त्यामुळे महाराष्ट्रातली एक वजनदार व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे सुरेश जैन पुन्हा एकदा अडचणीत आलेत.

जैन यांच्या कार्यंकर्त्यांची डॉक्टरला मारहाण

Last Updated: Wednesday, March 21, 2012, 12:25

जळगावमध्ये शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील, महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांच्यासह एका कार्यकर्त्याने जैन यांच्या डॉक्टरला मारहाण करून अर्वाच्च शिवीगाळ केल्याची तक्रार जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. ए. जी. राठोड यांनी केली आहे.

सुरेश जैन यांची 'बायपास' होणार

Last Updated: Wednesday, March 21, 2012, 07:56

शिवसेनेचे आमदार सुरेश जैन घरकुल घोटाळ्या प्रकरणी अटकेत आहेत. मात्र सोमवारी रात्री त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास सुरु झाल्यानं त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

जैन यांची तब्येत बिघडली, रूग्णालयात रवानगी

Last Updated: Tuesday, March 20, 2012, 08:35

जळगावमधल्या २९ कोटी ५९ लाखांच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे आमदार सुरेश जैन यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश अमळनेर न्यायालयाने दिले आहेत.

सुरेशदादांना अटक ही खडसेंची चाल?

Last Updated: Thursday, March 15, 2012, 15:08

जळगावच्या घरकुल घोटाळाप्रकरणी शिवसेना आमदार सुरेश जैन यांना झालेली अटक म्हणजे भाजप नेते एकनाथ खडसे यांची राजकीय खेळी आहे, असा घणाघाती आरोप जैन यांच्या वतीनं करण्यात आला आहे.

जैन यांचे सगळे घोटाळे बाहेर काढा- अण्णा

Last Updated: Sunday, March 11, 2012, 21:16

'आपण २००३ पासून घरकुल घोटाळ्यात सहभागी असलेल्या सुरेश जैन यांच्यावर कारवाई होण्यासाठी पाठपुरावा करत होतो. त्याला आता कुठे यश येत आहे', असं अण्णा यावेळी म्हणाले.

घरकुल घोटाळा : सुरेश जैन यांची चौकशी

Last Updated: Friday, February 3, 2012, 08:54

जळगावमधल्या २९ कोटी ५९ लाख रुपयांच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी शिवसेना आमदार सुरेश जैन यांची सुमारे सव्वा तीन तास चौकशी झाली. जैन या गुन्ह्यात थेट आरोपी नसले तरी त्यांच्याविरूद्धच्या काही पुराव्यांच्या आधारे चौकशी झाली. या आधी परिवहन राज्यमंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांची चौकशी झाली.

जळगावमध्ये खडसे X जैन X काँग्रेस

Last Updated: Tuesday, January 17, 2012, 15:11

जळगाव जिल्हा हा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला...मात्र गेल्या विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत त्याला तडे जायला सुरूवात झाली. त्यातच खडसे-सुरेश जैन वादामुळं युतीमध्येही तणाव आहे. त्यामुळं आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जैन विरुद्ध खडसे विरुद्ध काँग्रेस आघाडी यांच्यातला सामना रंगणार आहे....