Last Updated: Wednesday, June 13, 2012, 13:52
www.24taas.com मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल टोलविरोधी आंदोलनाच्या घोषणेनंतर मनसैनिकांची राज्यभर ‘टोल’धाड सुरु आहे. आज सकाळपासून मनसैनिकांनी वाशी, नाशिक-औरंगाबाद हायवे, मुंबई-अहमदाबाद हायवे, वसई, बुलढाणा या ठिकाणी जोरदार आंदोलनं केलंय. खालापूरजवळ मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरच्या टोलनाक्यावरही मनसेनं धाड टाकली. आंदोलकांनी खालापूर टोलनाक्यावर टोलवसूली बंद पाडली. तर बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड टोलनाक्यावर मनसौनिकांनी तोडफोड केली आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाडच्या ओढा इथल्या टोलनाकाही मनसैनिकांनी बंद पाडलाय. शिर्डीतही मनसेनं आंदोलन केलंय. कोपरगाव संगमनेर रोडवर टोलविरोधी आंदोलन केलं. रांजणगाव देशमुखजवळील टोलनाका मनसैनिकांनी बंद पाडला. खानिवडे टोलनाक्यावर टोलवसुली केली बंदमनसेचे टोलविरोधी आंदोलन आजही सुरुच आहे. मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई- अहमदाबाद हायवेवरील खानिवडे टोल नाका बंद पाडलाय. शेकडो कार्यकर्ते सकाळच्या सुमारास खानिवडे टोल नाक्यावर दाखल झाले. त्यांनी टोल वसुली बंद केली. विनाटोल वाहनांना त्यांनी सोडलं. यावेळी टोल नाक्यावर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मनसे कार्यकर्ते टोलनाक्यावर पोचल्यावर तिथल्या कर्मचा-यांनी पळ काढला. तर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं अनुचित प्रकार घडला नाही.
वाशी टोलनाका केला बंदवाशीतल्या टोलनाक्यावरही मनसैनिकांनी आज धडक दिली. टोलवसुली बंद पाडण्याचा प्रयत्न केला. काही काळासाठी इथली टोलवसुली बंद करण्यात आली होती. शिवाय एका मार्गिकेवरील वाहतुकही मनसैनिकांनी बंद पाडली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत आंदोलन करणा-या मनसैनिकांना ताब्यात घेतलं. वाशी टोलनाक्यावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
‘ओढा’ टोलनाक्यावर दिली धडकनाशिक औरंगाबाद रस्त्यावरील ओढा टोलनाक्यावरही मनसैनिकांनी मनसेनं टोलविरोधी आंदोलन केलं. राज्यभर मनसेच्या टोलविरोधी आंदोलनाअंतर्गत मनसैनिक या टोलनाक्यावर धडकले. यावेळी कार्यालय फोडून त्यांनी नाका काही काळ बंद पाडला. यावेळी आंदोलन करणा-या 100 ते 150 मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केलीय.
.
First Published: Wednesday, June 13, 2012, 13:52