मनसेचा झेंडा हाती घेतला आणि `तो` तुरुंगातच...

Last Updated: Wednesday, February 26, 2014, 15:51

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अटकेनंतर राज्यभर आंदोलनाचे पेव फुटले औरंगाबादही त्यात मागं नव्हतं मात्र या आंदोलनात उतरला म्हणून औरंगाबादच्या एका मनसे कार्यकर्त्याला चांगल्याच वेदना सहन कराव्या लागल्या.. तब्बल ६ दिवस जेलमध्ये त्याला राहावं लागलं आणि कुणीही पदाधिकारी त्याला सोडवायला आले नाही, अखेर कुटुंबियांनीच दागिने गहाण टाकत घरच्या या कर्त्या मुलाची सुटका केली.

पोलिसांची नाकाबंदी, मनसेचे १४ पदाधिकारी अटकेत

Last Updated: Wednesday, February 12, 2014, 09:11

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आज राज्यभरात होणा-या रास्ता रोकोच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसेच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची धडरपकड सुरु केलीय. तर मुंबई-कोल्हापूर बायपासवर चांदणी चौकात रास्तारोको केलाय. निफाड हायवेवर आंदोलन सुरू आहे. दरम्यान, नाशिक टोल नाक्यावर पोलिसांची नाकाबंदी करण्यात आलेय.

राज ठाकरेंना अटक, आरसीएफ पोलीस ठाण्यात राज

Last Updated: Wednesday, February 12, 2014, 16:13

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना चुनाभट्टीजवळ अटक करण्यात आल्यानंतर त्यांना आरसीएफ पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. दरम्यान, त्याचवेळी पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. तर कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले आहेत.

मनसेचा पुण्यात `अंडे का फंडा`… कार्यक्रम उधळला

Last Updated: Saturday, October 12, 2013, 13:45

पुण्यात मनसे कार्यकर्त्यांचं हे आंदोलन आणि घोषणाबाजी सुरु आहे ती चक्क अंड्यांच्या विरोधात. मनसेचं हे आंदोलन अंड्यांच्या विरोधात होतं. जागतिक `वर्ल्ड एग्स डे` निमित्त पशुसंवर्धन विभागानं शाळेतल्या विद्यार्थ्यांना उकडलेली अंडी देण्याचं ठरवलं होतं. मनसेला मात्र हे अंडे वाटप पचलं नाही. त्यांनी अंडी वाटपाचा कार्यक्रम सुरु होण्याआधीच उधळून लावला.

राज ठाकरे भडकले, दादर आंदोलन घृणास्पद!

Last Updated: Wednesday, April 10, 2013, 20:14

दादरमध्ये मनसैनिकांकडून घडलेला प्रकार घृणास्पद आहे. मनसेत अशा प्रकारांना धारा दिला जाणार नाही, अशा कडक शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकाची खरडपट्टी काढली आहे.

मनसेच्या आंदोलनाची पातळी घसरली, पोस्टरवर लघुशंका

Last Updated: Wednesday, April 10, 2013, 13:33

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात सुरू केलेल्या आंदोलनात मनसेचीही पातळी घसरल्याचं समोर आलंय. दादरला सुरू असलेल्या आंदोलनात एका लहान मुलाला पकडून त्याला अजित पवारांच्या पोस्टरवर लघुशंका करण्यास प्रवृत्त केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. हा मुलगा शाळेच्या युनिफॉर्ममध्ये होता.

सेना-मनसेसमोर मल्टिप्लेक्सनं टाकली नांगी...

Last Updated: Monday, August 13, 2012, 16:14

कलावंत आणि सेना-मनसे चित्रपट सेनेच्या आंदोलनासमोर अखेर पीव्हीआर मल्टिप्लेक्सनं अखेर माघार घेतलीय.

मनसैनिकांची वाशी टोलनाक्यावरही धाड

Last Updated: Wednesday, June 13, 2012, 13:52

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल टोलविरोधी आंदोलनाच्या घोषणेनंतर मनसैनिकांची राज्यभर ‘टोल’धाड सुरु आहे. आज सकाळपासून मनसैनिकांनी वाशी, नाशिक-औरंगाबाद हायवे, मुंबई-अहमदाबाद हायवे, वसई, बुलढाणा या ठिकाणी जोरदार आंदोलनं केलंय. खालापूरजवळ मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरच्या टोलनाक्यावरही मनसेनं धाड टाकली.