Last Updated: Thursday, June 28, 2012, 10:38
www.24taa.com, पंढरपूर विठूरायाच्या भेटीसाठी आतुर झालेले वारकरी आता पंढरपूरपासून हाकेच्या अंतरावर आहेत.. ज्ञानोबा माऊली आणि सोपानदेवांच्या पालखीची काल भेट झाली.
ही बंधूभेट पाहण्यासाठी वारक-यांमध्ये उत्साह आणि चैतन्याचं वातावरण होतं.त्यानंतर माऊलीचीं पालखी भंडीशेगावमध्ये मुक्कामी होती.. आज माऊलींच्या पालखीचं आज उभं आणि गोल रिंगण बाजीराव विहीरीजवळ होणार आहे. तर तोंडले बोंडले इथं धावा केल्यानंतर तुकोबारायांच्या पालखी पिराची कुरोली इथला मुक्काम आटोपून निघणार आहे.
तुकोबारायांच्या पालखीचं गोल रिंगणसुद्धा बाजीराव विहीरीजवळ होणार आहे. ज्ञानोबा माऊली आणि तुकोबारायांच्या पालखीचा आजचा मुक्काम वाखरीत असेल. तर निवृत्तीमहाराजांची पालखी चिंचोली इथं मुक्कामी असणार आहे.
व्हिडिओ पाहा
First Published: Thursday, June 28, 2012, 10:38