Last Updated: Friday, June 29, 2012, 10:44
www.24taas.com, सोलापूर सावळ्या विठूरायाच्या भेटीसाठी आतूर झालेल्या वारकऱ्यांचा मेळा आता पंढरपुरात दाखल होईल. आज वाखरीचा मुक्काम आटोपून सर्व पालख्या पंढरपूरकडे रवाना होतील.
आज वाखरीत तुकोबारायांच्या पालखीचे शेवटचं उभं रिंगण पार पडणार आहे. त्यानंतर सर्व पालख्या पंढरपुरात विसावतील. मध्यरात्रीपासून पंढरपूरच्या मंदिरात दर्शन बंद करण्यात येईल. त्यानंतर शनिवारी पहाटे अडीच वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची पूजा करण्यात येईल. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा आटोपल्यानंतर पुन्हा दर्शन सोहळा सुरु होईल.
दरम्यान आषाढी वारीसाठी पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. या विद्युत रोषणाईनं मंदिर उजळून गेलंय. रोषणाई आणि लाखो वारकऱ्यांमुळे मंदिर परिसरात चैतन्य निर्माण झालंय.
.
First Published: Friday, June 29, 2012, 10:44