Last Updated: Saturday, June 30, 2012, 10:55
www.24taas.com, पंढरपूर मंत्रालयातील अग्नितांडवातून तिरंग्याचं सुरक्षितपणे रक्षण करणाऱ्या मंत्रालय कर्मचाऱ्यांचा सत्कार पंढरपुरात करण्यात आला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांचा गौरव केला.
आषाढी यात्रेच्या निमित्ताने विठ्ठल मंदिर समितीकडून या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मंत्रालयातल्या आगीत जीव धोक्यात घालून या जिगरबाज कर्मचाऱ्यांनी तिरंगा सुरक्षितपणे खाली उतरवला होता. आपलं कर्तव्य पार पाडून, देशाचा मान कायम राखायचा होता, अशी भावना त्यांनी या घटनेनंतर व्यक्त केली होती.
First Published: Saturday, June 30, 2012, 10:55