शरद पवारांनी व्यक्त केली चिंता - Marathi News 24taas.com

शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

www.24taas.com, मुंबई
 
काही दिवसांपूर्वी पावसाची फारशी चिंता करण्याची गरज नसल्याचे सांगून दिलासा देणा-या कृषी मंत्री शरद पवारांनी आता मात्र महाराष्ट्र, कर्नाटकातील कमी पाऊस ही चिंतेची बाब असल्याचं म्हटलंय.
 
डाळ आणि ऊस पिकवणा-या राज्यांमध्ये कमी पाऊस झाल्यानं त्यांनी चिंता व्यक्त केलीय. खुद्द केंद्रीय कृषिमंत्र्यांनी पहिल्यांदाच अशी चिंता व्यक्त केलीय.
 
महिको बियाणे कंपनीवर कारवाई
शेतक-यांची फसवणूक करणा-या महिको बियाणे कंपनीवर कारवाई होणार आहे. राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही घोषणा विधानसभेत केली आहे. कापूस बियाणांच्या वितरणात गैरव्यवहार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात येणार आहे.
 
शेतक-यांकडून पैसे घेऊनही, कंपनीने बियाणे पुरविले नाही. याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर, कंपनीला राज्यात बंदी का घालू नये, अशी नोटीस सरकारकडून महिकोला पाठवण्यात आली आहे. लवकरच कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्र्यांनी विधानसभेत दिली.

First Published: Wednesday, July 11, 2012, 22:35


comments powered by Disqus