देवकरांचा राज्यमंत्रिपदाचा राजीनामा - Marathi News 24taas.com

देवकरांचा राज्यमंत्रिपदाचा राजीनामा

www.24taas.com, मुंबई
अखेर जळगाव घरकूल घोटाळा गुलाबराव देवकरांना भोवडलंय. घोटाळ्यातले मुख्य आरोपी देवकरांनी अखेर  परिवहन राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलाय.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांच्याकडे त्यांनी आपल्या राज्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला होता. त्यानंतर पिचडांनी हा राजीनामा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाठवलाय. घरकूल घोटाळ्याप्रकरणी देवकरांचा जामीन औरंगाबाद खंडपीठानं रद्द केल्यानंतर विरोधकांनी आक्रमक होत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीनंही त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते.
 
काय आहे घरकुल घोटाळा?
* जळगाव पालिकेची 1997 साली 11,424 घरांची 110 कोटींची योजना
* जळगाव घरकूल योजनेची 15 टक्केच घरे प्रत्यक्षात पूर्ण झाली
* या प्रकल्पाचे काम सुरेश जैन यांच्या निकटवर्तीय खान्देश बिल्डरकडे सोपवण्यात आलं
* नियम डावलून कंत्राट देऊन 2 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप
* तत्कालीन आयुक्त गेडाम यांच्याकडून 2006 मध्ये 91 जणांविरूद्ध गुन्हा झालाय दाखल
 
.

First Published: Wednesday, August 8, 2012, 03:00


comments powered by Disqus