Last Updated: Tuesday, February 14, 2012, 15:50
www.24taas.com, मुंबई पालिका निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोचला आहे. आज संध्याकाळी प्रचाराची मुदत संपणार असल्यानं सर्वच पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनीही जोरदार प्रचार सुरू केला आहे. शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचता यावं यासाठी ‘रोड शो’वर उमेदवारांनी भर दिला आहे.
पुण्यामध्ये मुख्यमंत्र्यांनीही झंझावती दौरा सुरू केला आहे. सकाळी आठ वाजता मुंख्यमंत्र्यांच्या प्रचार दौऱ्याला सुरूवात झाली. सिंहगड रस्त्यावरून या प्रचार दौऱ्याची सुरुवात झाली. उमेदवारांच्या कार्यालयांना भेट आणि कार्यकर्त्यांशी चर्चा असं या प्रचारफेरीचे स्वरूप होते. खडकवासला, पर्वती, आणि वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील १५ प्रभागात मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी सकाळच्या चार तासांत जवळपास अर्ध पुणं पालथं घातलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे रोड शोच्या माध्यमातून मुंबईत जोरदार प्रचार करणार आहेत. मुंबईसह राज्यातल्या दहा महापालिकांसाठीच्या या निवडणुकीकडे मिनी विधानसभा म्हणून बघितलं जातंय. त्यामुळं सगळ्याच पक्षांनी आज प्रचाराच्या तोफा थंडावण्याआधी रोड शोंचा धमाका केल्याचा दिसून येत आहे.
First Published: Tuesday, February 14, 2012, 15:50