Last Updated: Sunday, November 6, 2011, 06:58
झी २४ तास वेब टीम, नागपूर टीम अण्णांचे फोन टॅप होत असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केलाय. ते नागपुरात बोलत होते.
सरकारनं काहीही केलं तरी आम्ही आमचं काम करीतच राहणार असा निर्धारही त्यांनी व्यक्त केलाय. सरकारमधील मंत्र्यांचा नामोल्लेख टाळत त्यांनी भ्रष्टाचारी लोक आमच्या मागं लागल्याचा आरोपही केलाय. यावेळी काहींनी गोंधळ करुन कार्यक्रमात विघ्न आणण्याची प्रयत्न केला.
दरम्यान, राजू परुळेकर यांच्याशी वाद झाल्यावर आता अण्णा नव्यानं ब्लॉग लिहणार आहेत. राळेगणसिद्धीत याबाबत अण्णांनी घोषणा केली. तसंच आपले फोन टॅप होत असल्याचा आरोप अण्णांनीही केला आहे. अण्णांनी नव्यानं ब्लॉग लिहिण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यासाठी दोघांची नेमणूक करण्यात येईल. असं अण्णांनी राळेगणमध्ये सांगितलं आहे.
First Published: Sunday, November 6, 2011, 06:58