Last Updated: Wednesday, February 29, 2012, 14:00
www.24taas.com, मुंबई सरकारी धोरणांच्या निषेधार्थ स्कूल बसचालकांनी राज्यव्य़ापी संपाचा इशारा दिला आहे.
९ मार्चपासून हा संप पुकारण्यात येणार आहे. ऐन परीक्षांच्या काळात संप पुकारल्यानं विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत. दहावी बारावीच्या परीक्षांच्या काळातच संप करुन विद्यार्थी आणि पालकांना वेठीस धरण्यात येत असल्याचं पालकांचं म्हणणं आहे.
खरंतर, काल झालेल्या देशव्यापी संपामध्ये मुंबईतील कर्मचारी संघटना सहभागी झाल्या नव्हत्या. यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याचं कारण पुढे केलं होतं. मात्र स्कूलबसच्या चालकांनी यापासून काहीच बोध न घेता मार्चमध्ये ऐन परीक्षांच्या काळातच संपावर जाण्याची भाषा केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी हे काळजीचं कारण बनलं आहे.
First Published: Wednesday, February 29, 2012, 14:00